पुणे । आंबेगाव ब्रुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय स्तरावर 385 विद्यार्थ्यांच्या सहभागात छत्रीवरील कॅलिग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक वेळी चित्रे किंवा कॅलिग्राफी पेपरवर करण्यात येते. यावेळी मात्र ही कॅलिग्राफी छत्र्यांवर साकारण्यात आली. आपली छत्री आपणच रंगवा आणि वापरा हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी एका नवीन सरफेसवर विविध रंगांनी रंगकाम करून त्यावर सुलेखन (कॅलिग्राफी) करण्याचा आनंद लुटला. तसेच वेगळ्या माध्यमावर कॅलिग्राफी करण्याचे तंत्रही अवगत केले. या उपक्रमासाठी सुलेखनकार अनिकेत दीक्षित कलाशिक्षक महेश राऊत, अमित घोडके व सुरेश उदमले यांचे मार्गदर्शन लाभले तर यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप, सचिव सुनिता जगताप, प्रा. वर्षा शर्मा आदी उपस्थित होते.