विद्यार्थ्यांनी दिला तंबाखूमुक्तीचा संदेश

0

होळनांथे । शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा, चारणपाडा येथील जवळपास पाचशे विद्यार्थींनी रॅलीद्वारे तंबाखु मुक्तीचा संदेश दिला. सलाम मुंबई फाऊंडेशन स्व.डी. आर.प्रतिष्ठान, आई जोगेश्‍वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखु मुक्त शाळा अंतर्गत जनजागृतीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विस्तार अधिकारी निता सोनवणे यांनी रॅलीचे उद्घाटन केले.

घोषणाबाजीने जनजागृती
यावेळी तंबाखु मुक्तीचे विविध बॅनर व घोषणाद्वारे तंबाखुचे दुष्पपरिरणाम मांडले. यावेळी केंद्र प्रमुख के.व्ही.भदाणे, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी.पाटील, मुख्याध्यापक आर.के.पाटील, मनोहर चौधरी, डी.आर.राजपूत, भटेसिंग चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जोगेश्‍वरी संस्थेचे योगेश पाटील सहशिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थित होते.