चाळीसगाव । विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास हा सर्व बाजूने झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कला व छंद जोपासावेत आणि विविध कौशल्य अंगी भिनवावेत विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारी ज्ञान मिळविण्याकडे लक्ष द्यावे. विद्यापीठ परीक्षेला सामोरे जातांना तणावमुक्त राहुन परीक्षेच्या व्यवस्थापनेसाठी व व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकासामध्ये विविध कलागुणांचे व छंदांना अनन्य साधारण महत्व असते. असे रा.स.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष डॉ.एम.बी.पाटील यांनी चाळीसगाव येथील य.ना.चव्हाण महाविद्यालयात आयोजित कला गुण दर्शन कार्यक्रमात सांगितले. यावेळी ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी उदघाटक म्हणून चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
यावेळी युवारंग महोत्सवात सुवर्णपदक व इतर पदके प्राप्त करणार्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरूण निकम, संजय देशमुख, संजय पाटील, आनंदा पाटील, पुष्पा भोसले, शेषराव पाटील, प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव, प्रा. पी.जी.रामटेके, एस.आर.जाधव, एच.आर.निकम, रावसाहेब त्रिभूवन, उपप्राचार्य एम.वाय. चव्हाण, प्रा. बी.एन.पवार, प्रा. डॉ. एस.व्ही.साखला, प्रा. डॉ. कु. यु.आर.मगर, प्रा. सी.डी.डोंबरे, राजू बडगे, जी.बी. शेळके, सौ. आर.बी.पाटील, एम.एस. बेलदार, व्ही.पी.शिरसाठ, एस.एस.राऊत उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.एन.पी. गोल्हार यांनी तर आभार प्रा.एच.आर.निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.सि.डी. ठोबरे, ए.एल.सुर्यवंशी, जी.बी.शेळके, जी.डी.देशमुख, के.पी.रामेश्वरकर, रवि चव्हाण, यांचेसह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.