नंदुरबार । खेळ कुठलाही असो, मैदानी गजबजली पाहीजेत. मोबाईल, संगणकापेक्षा खेळांना प्राधान्य द्यायला हवे. यासाठी सर्वांनी खेळ भावना जोपासावी, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील 2 री ज्युनिअर फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, राज्य संघटनेचे सचिव रविंद्र चोथवे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, राजेश रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, कैलास पाटील, योगेश चौधरी, मोहित राजपूत, अविनाश माळी, प्राचार्य शिवाजी पाटील, मिनल वळवी, अरुण हजारी, क्रीडा संघटक प्रा.मयुर ठाकरे, जिल्हा सचिव जितेंद्र माळी, रविंद्र पवार, हिरालाल मराठे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त रविंद्र पाटील, दिपक वाडे, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
ज्युनिअर फ्लोअरबॉल अजिंक्यपद स्पर्धा
फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्यावतीने 2 री ज्युनिअर फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनााप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश पाटील याने फ्लोअरबॉलचे प्रात्यक्षिक दाखविले.
यांनी पाहिले कामकाज
प्रास्ताविक प्रा.मयुर ठाकरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.गणेश पाटील तर आभार जितेंद्र पगारे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राकेश माळी, विजय जगताप, राजेश शहा, मनिष सनेर, अंकुश रघुवंशी, रविंद्र सोनवणे, श्रीराम मोडक, अनिल रौंदळ, आनंदा पाटील, आनंदा मराठे, सौरभ कानोसे, भरत चौधरी, योगेश माळी, प्रदीप माळी, राजेश्वर चौधरी, महेश भट आदींनी कामकाज पाहिले.
खेळ भावना जोपासा
यावेळी बोलतांना आ.रघुवंशी म्हणाले, की जिल्हा राज्यात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू शहरामध्ये आम्ही राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना कुठलीही अडचण भासू देणार नाहीत. यासाठी राज्यातून आलेल्या या खेळाडूंना आमदार निधीतून एक लक्ष रुपयाची भरीव मदत आ. रघुवंशी करतील अशी ग्वाही दिली. खेळ कुठलाही असो, मैंदाने गजबजली पाहीजेत. मोबाईल, संगणकापेक्षा खेळांना प्राधान्य द्यायला हवे. यासाठी सर्वांनी खेळ भावना जोपासावी, असे सांगितले.