जळगाव। नेहरु युवा केंद्र जळगाव व शानुबाई चौधरी माध्यमीक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडानिमित्त आव्हाणे गावात स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी तसेच नेहरू युवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. दरम्यान, रॅलीतून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीपर घोषणा देवून त्याबाबत माहिती नागरिकांना दिल्या.
रॅलीत यांचा होता सहभाग
स्वच्छतेची सुरवात अगोदर आपल्यापासुन व्हावी यासाठी विद्यालयाचे मुख्यध्यापक डी.पी. पवार यांनी स्व:त व विद्यार्थ्याकडुन शाळेचा परीसर स्वच्छ करुन घेतला. त्यानतंर गावात स्वच्छता रॅलीची सुरवात करण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यानी स्वच्छ गांव, सुदंर गांव’ तसेच स्वच्छ गांव, निरोगी गाव’ अश्या प्रकारच्या घोषणा देउन गावात जनजागृती केली. या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्यध्यापक डी.पी. पाटील, डी.टी. पाटील, पी.आर. पाटील, व्ही.डी. चौधरी, ए.के.वानखेडे, शिक्षकवृंद उपस्थीत होते. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका युवा समन्वयक राकेश वाणी यांनी केली, व जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम यांचे मार्गदर्शन लाभले, नेहरु युवा केंद्र जळगाव येथील लेखापाल सुनिल पंजे, विशाल शिदें, ओम गुजर, सुनिल पाटील, आदीचे सहाकार्य लाभले.