फैजपूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत करा, स्पर्धा परिक्षा मात्र जीवघेणी होवू देवू नका. आयुष्यात विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविण्याचे व नेतृत्व करायला शिकण्याचे कौशल्य आत्मसात करुन संस्कारी बनण्याचे आवाहन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. येथून जवळच असलेल्या आमोदे येथील घ.का. विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ जावळे होते. याप्रसंगी विद्यालयातील 52 विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती नारायण चौधरी, उपशिक्षणाधिकारी अरुण पाटील यांची उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थीनींसह मातेचा केला सत्कार
इयत्ता दहावीत प्रथम आलेली टिना पाटील व तिच्या मातेचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी मनोगतात उपशिक्षणाधिकारी अरुण पाटील यांनी मुलांना शिक्षकांचा सन्मान करुन त्यांचे स्थान मुलांनी जपावे, असे सांगितले. बक्षिस प्रेरणा देते, स्पर्धा वाढविते, उत्साह वाढविते त्यामुळे बक्षिस मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, चिटणीस महेंद्र सरोदे, विवेक लोखंडे, उपाध्यक्ष राजेेंद्र चौधरी, धनराज चौधरी, चंद्रकांत पाटील, सुभाष महाजन, एकनाथ लोखंडे, मोहन लोखंडे, संजिव चौधरी यांसह देणगीदार व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक एम.पी. सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन एस.बी. बोठे यांनी केले. एल.पी. पिंपरकर यांनी बक्षिस वाचन तर जे.व्ही. वानखेडे यांनी
आभार मानले.