रावेर । विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन सुरु करावे या मागणीसाठी येथील सरदार जी.जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी तहसील व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढुन गटविकास अधिकारी सानिया नाकाडे यांना निवेदन दिले.
महाविद्यालयात सुमारे पंधरा शिक्षक विनावेतन सुमारे 17 वर्षापासून शिक्षक शैक्षणिक ज्ञानदानाचे कार्य करत असून 1 ऑगष्ट पासून त्यांनी बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरु केले आहे.