नवापूर । तालुक्यातील करंजी बुद्रुक येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका माथा गावीत यांची तर सुस्मिता गावीत, ऋषीदा गावीत, रिता गावीत आदींची यावेळी उपस्थिती होती. सर्व प्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्षांनी शिक्षकाची भूमिका नेमकी कशी असावी या बाबत विचार प्रकट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली त्यात नील गावीत, स्नेहल गावीत, शिरीष गावीत, सागर गावीत, अमित गावीत, स्वराज गावीत, उज्ज्वला गावीत आदी विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मिता गावीत हिने केले. राजधर जाधव, प्रशांत सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
फळझाडांचे वाटप
शिक्षक दिनानिमित्त फ्रेंड्स फौण्डेशन कडवानतर्फे शिक्षक दिनानिमित्त फलबाग योजनेअंतर्गत शेतकरी कृषी गट व महिला बचत गटांना मोफत फळझाडे वाटप करण्यात आले. संस्थेचे कार्यकारी संचालक शमुवेल गावित हे शिक्षक असल्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेत सहभाग व्हावा याकरिता शेतकरी कृषिगट तयार करुन व महिला बचत गटाना भविष्यात फळबाग योजनेचा फायदा व्हावा याकरिता ’केसर” हाफुस” दशेरी’ ’बारमासी’ ’फणस’इत्यादि फळझाडे 30 शेतकर्यांना प्रत्येकी 10 व महिला असे 350 कलमी रोपांचे वाटप करण्यात आले. अर्जुन गावित, शिलास गावित यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत.
दुधखेडा विद्यालय
शहादा तालुक्यातील दुधखेडा येथील श्री नागेश्वर माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत चिमन जाधव व विद्यार्थी मुख्याध्यापक प्रकाश बिरारे यांनी डॉ.सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुण कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यालयातील शिक्षक रमेश बिरारे, नितिन सावळे, महेंद्र चव्हाण, वैशाली देसले, शारदा कुमावत, दीपिका खैरणार, लक्ष्मी चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ.राधाकृष्णन यांना अभिवावदन
नवापूर येथील श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे शिक्षकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वाघ होते. मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत विशाखा गावीत, पर्यवेक्षक एम.जे.सोनवणे, ए.बी.थोरात, वरिष्ठ शिक्षक ए.डी. सूर्यवंशी, मीना खुटे, सी.एन.बर्डे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वतीचे वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित शिक्षकांसाठी परीक्षा घेऊन त्यात सर्वाधीक गुण मिळवणार्या मिलिंद वाघ यांना सन्मानित करण्यात आले. यात इकोफ्रेंडली गणेशोस्तवात प्रथम क्रमांक मिळवणार्या साक्षी भावसार या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.