विद्यार्थ्यांनी शिक्षका मधील व्यवहारिक ज्ञान,शिस्त,संयम, कौशल्य, क्रियाशीलता नम्रता ही शिक्षका कडुन घेतली पाहिजे .डॉ नरेन्द्र जाधव
यावल ( प्रतिनिधी ) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुखअतिथी व मान्यवरांच्या हस्ते भारताचे पहिले माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी भूषविले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.सुभाष कामडी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, डॉ. एस. पी कापडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.नरेंद्र महाले यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व शिक्षकाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम आहे. शिक्षक हा सरस्वतीच्या मंदिरातील पुजारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो.तो सर्वगुणसंपन्न एकमेव समाजाचा परिवर्तना बरोबरच शिक्षकांमध्ये व्यावहारिक ज्ञान,शिस्त, संयम,कौशल्य,क्रियाशीलता, नम्रता संस्कारशील वातावरण,आपुलकी हे गुण विद्यार्थ्यांनी कोणत्याही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. यशस्वीतेसाठी स्पर्धा परीक्षा, अध्ययन हा सर्वात महत्वाचा शिक्षकाचा गुण विद्यार्थ्यांनी घेऊन आपण परिवर्तन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन करताना, शिक्षक हा ज्ञानाचा सागर असतो. शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षका मधील नम्रता,सहनशीलता, विनयशीलता,कष्ट करण्याची क्षमता ह्या गुणांचा वर्तवणुकित अंगिकार केला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रजनी इंगळे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार डॉ.निर्मला पवार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संतोष जाधव, प्रा. सि टी वसावे,प्रा.मिलिंद मोरे,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.नरेंद्र पाटील, प्रा. अक्षय सपकाळे,प्रा.प्रतिभा रावते, डॉ.वैशाली कोष्टी,प्रा. सोनल बारी, प्रशांत मोरे,प्रा मिलिंद बोरघडे, प्रा.संतोष ठाकूर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.