मुक्ताईनगर- विविध क्षेत्रात लागलेल्या शोधामुळे माणसाचे जीवन सुखकर झाले आहे. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक गुणांसोबत जिज्ञासा व संशोधक वृत्ती जोपासावी, असे आवाहन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी करीत विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग वाढविला पाहिजे, आजचा विद्यार्थी उद्याचा शास्त्रज्ञ असल्याचे चांगदेव येथे विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी होते. व्यासपीठावर जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, वनिता गवळे, वैशाली तायडे, नगराध्यक्षा नजमा तडवी, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, सुवर्णा साळुंखे, सरपंच अतुल पाटील, गटविकास अधिकारी डी.पी.लोखंडे, गटशिक्षणाधिकारी व्ही.डी.सरोदे, केंद्रप्रमुख पाठक, संजय ठोसर, ग्रामविकास अधिकारी आर.एस.चौधरी, प्राचार्य एस.डी.पाटील, आर.पी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात विविध गटात 90उपकरणे मांडलेली होती. विज्ञान हे शास्त्र आहे आणि शस्त्र ही आहे. गटशिक्षणाधिकारी व्ही.डी.सरोदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय चौधरी तर आभार प्राचार्य एस.डी.पाटील यांनी मानले. रांगोळी व सजावट राजू साळी यांनी केली.