प्रतिनिधी तळोदा:-
नंदुरबार तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा नांदरखे येथिल विद्यार्थ्यानी चंद्रयान 3 वैज्ञानिकांना मानवंदना देण्यासाठी मानवी साखळीद्वारे इस्रो v व चंद्रयान ३ नावांची मानवी साखळी साकारली.या अनोख्या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुक करण्यात येत आहे.
भारताची चंद्रयान तीन मोहीम नुकतीच यशस्वी झाले असून या मोहिमेबद्दल शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.अनेक शाळांमध्ये या उपक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना चंद्रयान तीन या मोहिमेची अधिक व्यापक ओळख व्हावी व इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी,यासाठी नंदुरबार तालुक्यातील नांदरखे येथील आश्रमशाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रम प्रसंगी अवकाश संस्था इस्रो चंद्रयान 3 ची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने अवकाश संस्थेचे ‘ इस्रो ‘ हे ‘चंद्रयान 3’ चे प्रतिक म्हणून ‘सी ३ ‘ अशी आद्याक्षरे तयार केली.या द्वारे भारताचे चंद्रयान तीन मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना मानवंदना देण्याचा छोटासा प्रयत्न चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असल्याचे शाळे करून सांगण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
फोटो: नंदुरबार तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा नांदरखे येथिल विद्यार्थ्यानी चंद्रयान 3 वैज्ञानिकांना मानवंदना देण्यासाठी मानवी साखळीद्वारे इस्रो व सी ३ नावाच्या आद्याक्षरांची साकारलेली मानवी साखळीची प्रतिकृती…