विद्यार्थ्यांनी सादर केले संगणकीय कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक

0

मुक्ताईनगर : येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील कॉम्पिट क्लब व गुरुनाथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय आयटी पर्व या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा पोस्टर प्रेझेंटेशन, सी/सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग व क्वीज कॉम्पिटिशन या तीन भागात घेण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे, स्कुल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, उमवि जळगावचे संचालक प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरावरच नव्हे तर राज्य व देश पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास गुरुनाथ फाऊंडेशनचे सचिव विजय चौधरी, संगणकशास्त्र विभागप्रमुख वंदना चौधरी, संगणक शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य लाभले. स्पर्धांचे परिक्षण प्रा. जी.आर. वाणी, प्रा. वर्षा पाठक, प्रियंका बर्‍हाटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वंदना चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन व आभार अंकिता रोकडे या विद्यार्थीनीने केले.

ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे
प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांनी 21व्या शतकात संगणकशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विविध संधी आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.आर. पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणातून स्पर्धकांना स्पर्धेचे स्वरुप, महत्व व आवश्यकता या घटकांचे स्वरुप स्पष्ट करुन दिले.

यशस्वी विद्यार्थी असे
सदर स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन अंतर्गत प्रथम बक्षीस स्वप्निल बावस्कर व अजय देवकर, द्वितीय बक्षीस जान्हवी जामोदे, साक्षी जुनारे, सी/सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग कॉन्टेस्ट अंतर्गत प्रथम बक्षीस पुजा जंगले व राजश्री काळे, द्वितीय स्वाती जंगले व शितल नाफडे, क्विज कॉम्पिटिशन अंतर्गत प्रथम बक्षीस शुभम बोराखेडे व नितीन कपले, द्वितीय मोहिनी नाफडे, स्नेहल नारखेडे या विद्यार्थ्यांनी मिळविले.