विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन करावे

0

मुक्ताईनगर : सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांकडे वळावे तसेच संगणक साक्षर बनण्याचे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. येथील जे.ई. स्कुलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, सभापती राजेंद्र माळी, संस्थेचे सचिव डॉ. सी.एस. वाघ, पोलीस निरीक्षक कडलग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही.एम. चौधरी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य आर.पी. पाटील यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान गायकवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष जे.जे. पाटील यांसह शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार गाढे यांनी मानले.