निगडी । औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस नव-नवे संशोधन होत आहे. अत्याधुनिक औद्योगिकीकरणाच्या नाविन्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ची कौशल्य क्षमता विकसित करावी, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले. निगडी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधील प्रथम वर्ष विभागाच्या इंडक्शन प्रोग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी संस्थेचे सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीष देसाई, गोरख भालेकर, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्रा. डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख प्रा. शुभदा फुलंबरकर, पालक प्रतिनिधी डॉ. भावना बुलानी, डॉ. सचिन गेंगजे उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. जयंत उमाळे, विद्यार्थी विकास व कल्याण अधिष्ठाता डॉ. शीतल भंडारी, संशोधन व नाविन्यता अधिष्ठाता डॉ. संजय लकडे, औद्योगिक व शैक्षणिक संस्था अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात 1400 विद्यार्थी व पालक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. प्रांजल जोग, प्रा. सुवर्णा शेटे यांनी सहभाग घेतला. प्रा. सोनल शिर्के व प्रा. मीरा थोरात यांनी केले. प्रा. प्रांजल जोग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विविध उपक्रमांची माहिती
विभाग प्रमुख प्रा. शुभदा फुलंबरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहभागाची गरज विशद केली. प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच उच्चशिक्षण कौशल्य विकास व उद्योजकता यांचे महत्व व त्यासाठी महाविद्यालयातील रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन, हायर स्टी सेल (उच्च शिक्षण विभाग), विद्यार्थी विकास व कल्याण कक्ष या अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली. विश्वस्त भाईजान काझी यांनी, विद्यार्थ्यांना उच्चतम गुणवत्तेबरोबरच, सामाजिक व कौटुंबीक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले.