एरंडोल : विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित जरूर व्हावे, डॉक्टर, इंजिनियर व्हा परंतु त्याअगोदर चांगला माणुस व्हा, असे आवाहन अध्यक्षस्थानावरून बोलतांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचेे सिनेट सदस्य प्रा.डी.आर.पाटील यांनी एरंडोल येथील पद्ममालय सायन्स अकॅडमी आणि उन्नती फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.शिवाजी अहिरराव, प्रा.सलीम शेख, प्रा.एन.ए.आहिरे, प्रा.के.बी.पाटील, प्रा.अतिफ शेख, प्रा.प्रवीण कोळी आदी होते.
737 विद्यार्थ्यांची उपस्थिती
उन्नती फाउंडेशनचेसंचालक प्रा.राहुल शिंपी यांनी विद्यार्थ्यांना जे.ई.ई.,सी.ई.टी.,नीट या महत्वपुर्ण परीक्षांसाठी प्रवेश मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रा.अहिरराव यांनी गणित विषय कठीण नसतो. त्यासाठी आवड व गोडी निर्माण करून जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केल्यास सर्वच विषय सोपे जातील असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, प्रास्ताविक प्रा.आर.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रा.सागर रायगडे यांनी मानले. यावेळी 737 विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.