जळगाव । लहानपणीच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार झाले, त्यांना योग्य मार्ग दाखविला, अभ्यासाभिमुख केले तर निश्चितच पुढे उच्च पदावर तर पोहचतीलच पण एक चांगला माणूसही घडेल असे विचार येथील शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांनी व्यक्त केले. वुमेन अँड चाईल्ड प्लस या संस्थेची दुसरी शाखा बळीराम पेठेत सुरु करण्यात आली. प्रदिप ठाकुर यांच हस्ते शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे नगरसेवक सुनिल माळी,डॉ.महेंद्र काबरा,विनोद ढगे, नृत्य शिक्षक गिरीष भोसले, गवळी समाज अध्यक्ष सुरेश गवळी व्यासपिठावर उपस्थित होते.
अंधश्रध्दा विषयावर पथनाटय सादर
प्रारंभी विनोद ढगे आणि सहकार्यांनी स्वच्छता,शिक्षण, अंधश्रध्दा या विषयावर पथनाटय सादर केले. प्रमुख अतिथींनी दिप प्रवलन केले. संस्थेच्या अध्यक्षा शांता वाणी यांनी संस्था कष्टकर्यांच्या विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या कामाची माहिती देवून बळीराम पेठेतही या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेण्यात येतील तर महिलांसाठी मोफत शिवणकाम ,भरतकाम, क्राफ्ट वर्ग घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवणक्लास कोर्स पूर्ण झाल्यावर किमान पाच महिलांना शिलाई मशिन देण्याचे घोषित केले.
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य उवला मावळे यांनी महिलांना शिवणकाम, भरतकाम, क्राफ्ट आमच्या कॉलेजला मोफत शिकवू . महिलांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. तसेच वुमेन ऍड चाईल्ड केअर प्लस ही संस्था चांगला समाज घडविण्यासाठी चांगला प्रयत्न करित असल्याचे विदीत केले. सुनिल माळी व प्रकाश जगताप यांनीही शुभेच्छा व्यक्त करुन परिसरातल विद्यार्थिंना व महिलांनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
प्रोत्साहनपर गाणी सादर
कार्यक्रम दरम्यान इतनी शक्ती हमे देना दाता व छोडो कलकी बाते ही प्रोत्साहन देणारी गाणी संस्थेच्या सदस्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अल्पना शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना चित्ते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता बडगुजर, हेमलता कुळकर्णी, समाधान पवार, नंदा पाटील, संगिता यादव, शिल्पा रावेरकर, छाया पाटील, रुपाली पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राजेश यावलकर, प्रसाद जोशी, भिमा गवळी, राजु गवळी, राजश्री जोशी, गवळी समाज पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.