शहादा । शहरातील वसंतराव नाईक संकुलात तिसरा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिना निमीत्ताने वसंतराव नाईक माध्य. शारदा कन्या विद्यालय महिला कॉलेज वसंतराव कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सोबत विध्यार्थी व विध्यार्थीनी योगा केला. प्रथम योगाचे महत्व सांगण्यात येवुन विविध योगासनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.योग शिक्षकासोबत सर्वानी योग विषयी माहिती मिळ्वून योगा केला. योग प्रशिक्षक म्हणून जगन्नाथ बोरसे व कालुसिंग मोते यांनी मार्गदर्शन केले.
यशवंत विद्यालयात योगाचे प्रात्यक्षिक व योग
नंदुरबार येथील यशवंत विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाची प्रात्यक्षिके व योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व शारदा प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय योगपटू खुशबु घरटे व मेघा धनगर या खेळाडूंनी योगासनाची प्रात्यक्षिके मंचावरुन दाखविली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य शिवाजी पाटील, पर्यवेक्षक अरुण हजारी, मुख्याध्यापक सुनिल पाटील, आनंदा पाटील, प्रा.डी.एस.नाईक, प्रा.शैलेंद्र पाटील आदींसह प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगा केला. यावेळी महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.मयुर ठाकरे यांनी योगाचे महत्त्व व योगाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा करण्याचा निश्चय करण्यात आला.
खेळाडूंनी योगाची प्रात्याक्षिके दाखविली
जिल्हाभरातून 118 खेळाडूंनी स्पर्धेस उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू खुशबू घरटे, पलक पटेल, मेघा धनगर, सोमेश जोशी आदी खेळाडूंनी योगाची प्रात्याक्षिके दाखविली. स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम कुलदिप पाटील, द्वितीय भगत कारंडे, तर तृतीय चेतन पाटील, तर मुलींमध्ये प्रथम दिव्या बोराणे, द्वितीय राजवी बच्छाव तर तृतीय निकिता बैसाणे, 17 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम सोमेश जोशी, द्वितीय अक्षय पावरा तर तृतीय हरिष निकम, मुलींच्या गटात प्रथम मेघा धनगर, द्वितीय पायल जाधव, तृतीय किर्ती राजपूत, 19 वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम नकुल चौधरी, द्वितीय राजु सोलंकी व तृतीय भुषण माळी, तर मुलींच्या गटात प्रथम पुनम भाटी, द्वितीय अंजु भिल तर तृतीय माधवी घाटे. स्पर्धेला पंच म्हणून शांताराम मंडाले, जितेंद्र माळी, राकेश माळी, खुशबू घरटे, प्रा.सुनिल पाटील, मनिष सनेर आदींनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पाटील तर आभार मयुर ठाकरे यांनी मानले.