विद्यार्थ्यांसाठी अजूनही गणवेशाचा निधी नाही

0

मोखाडा : पारदर्शक कारभारामुळे यंदापासुन जिल्हा परीषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश शालेय व्यवस्थापन समिती ऐवजी सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर निधी देवुन तो स्वतः विद्यार्थी व पालकांनीच खरेदी करावयाचा आहे. मात्र अजूनही अशा कोणत्याच खात्यावर गणवेशाचे पैसे आलेले नाहीत यामुळे आजची ही प्रक्रीया कासवगतीने चालत असल्याने 15 ऑगस्ट पर्यत गणवेश मिळण्याची सुतरामही शक्यता वाटत नाही. आश्रमशाळा असो कि जिल्हा परीषदेच्या शाळा यामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याना मिळणार्या प्रत्येकी दोन गणवेशातील पहीला गणवेश हा स्वातंत्र्य दिनाच्या आत मिळायला हवा. हा दिवस साजरा करताना किमान नव्या गणवेशावरती झेंड्याला सलामी द्यायला हवी असा शासनाचा नियम असताना अजूनही कसलीही कार्यवाही याबाबत झालेली नसल्याने शासनाच्या उदात्त हेतुलाच मूठमाती मिळत असुन याबाबत संताप व्यक्त होत आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर या शाळांनी विद्यार्थ्यांची खाती उघडण्याची प्रक्रीया ज्या गतीने करायला हवी होती ती अद्याप दिसत नसल्यामुळे आजघडीला याशाळांतील 60 टक्के विद्यार्थ्यांची खातीच उघडलेली नसल्याने या नियमाची ठोस अमलबजावणी होणार नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे दरसाल गणवेश दिला जाणे हे निश्चित असतानाही आश्रमशाळा कडुन गणवेश शिवण्यासाठी यंत्रणाची नियुक्ती करण्यास दरवर्षी वेळ वाया घालवला जातो एकूणच यासगळ्या प्रक्रिया मुळे देश भर स्वातंत्र्य दिवस उत्साहात आनंदात साजरा होत असतानाच याभागातील विद्यार्थ्याना मात्र जुण्याच गणवेशावर आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.