विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्राध्यापकांची भटकंती

0

शहादा । तालुक्यात इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयतील प्राध्यापक विद्यार्थ्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये भेटी देत आहेत.विद्यार्थांच्या शोधासाठी कसरत करावी लागत आहे. या वर्षी ते प्रमाण वाढले आहे. दोंडाईचा ता. शिंदखेडा येथील जयकुमार रावल इंजिनिअरिंग कॉलेज अक्कलकुवा येथील जामीया इंजिनिअरिंग कॉलेज, अहिंसा इंजिनिअरिंगचे प्राध्यापक,शहादा शहरातील विविध उच्च माध्य. विद्यालयात जावून 12 वीच्या निकालानंतर ज्या दिवशी गुणपत्रक वाटप झाले. त्या दिवशी विद्यार्थ्याना इंजिनिअरिंग विषयी माहिती देत होते. माहितीपत्रकातुन आपापल्या महाविद्यालयाची गुणवत्ता दाखवत होते. एवढ्यावर न थांबता विद्यालयामध्ये विविध डिजीटल बॅनर लावले आहेत.

इंजिनिअरींगकडे विद्यार्थ्यांचा कल कमी
काही महाविद्यालयातील शिक्षकाना गेल्या आठ दिवसापासुन याच कामावर लावले आहे.आपल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा म्हणून सवलती देत आहेत.प्राध्यापक शेवटपर्यंत विद्यार्थी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.खाजगी महाविद्यालयाचे विद्यार्थी संख्येवरून भवितव्य अवलंबून आहे. शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याची विद्यार्थीची धडपड असते. तसा त्यांचा कल असल्याने खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजवर त्याचा परिणाम झाला. सध्या दोन तीन वर्षापासून विद्यार्थ्याचा इंजिनियरींगकडे कल कमी झाल्याची माहिती प्राध्यापकानी दिली. अनेक महाविद्यालयामध्ये जागा रिक्त असतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.वैद्यकीय क्षेत्र,कृषी महाविद्यालय, संगणक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त दिसतो. परिणामी विद्यार्थ्यांच्या शोधासाठी इंजिनियरींगच्या प्राध्यापकांना देखील भटकंती करावी लागते .