विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0

चिंबळी ।  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच कलाक्षेत्राची आवड निर्माण करण्यासाठी एलआयसी कंपनीच्यावतीने कुरूळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध चित्रात रंग भरणे व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारीत 10 प्रश्‍न सोडवून घेणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे सरपंच चंद्रकांत सोनवणे, उपसंरपच अमित मुर्‍हे, चंद्रकात सोनवणे, बाळासाहेब बागडे, शातांराम घाडगे, अनिल बागडे, आशिष मुर्‍हे आदी मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले.