विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ!

0

चिंचवड – चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे 10 वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ झाला. समारंभाची सुरूवात अशी पाखरे येती या गाण्यापासून झाला. पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी यांनी प्रास्तविकात संवेदनशिलता जागृत ठेवा. आई-वडिलांची सेवा करा, असे सांगून शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे माजी प्रशासन अधिकारी विष्णू जाधव यांनी विद्यार्थी देशाचे भवितव्य घडविणार आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेली ज्ञानाची शिदोरी याचा वापर करावा.

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. आई-वडीलांना विसरू नका, असे सांगितले. यावेळी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ चिंचवडे सरांनी शिक्षण हे जीवनाला कलाटणी देणारे वळण आहे. यासाठी संकल्पाची जोड पाहिजे असे सांगितले. शिक्षिका निलिमा कन्हेरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार माधवी कुलकर्णी यांनी केले.