विद्यार्थ्याचे आधार स्तंभ जयप्रकाश लांबोळे

0

जळगाव । विनर्स क्लब च्या माध्यमातून मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे यांनी अनके विद्यार्थाचे करिअर घडविले आहे.विद्या विद्यार्थांना नेहमी त्यांनी आयुष्यात चढ उताराचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो त्या मुळे संघर्षाचा सामना करून त्यावर मात करा.संस्थेने केलेल्या वाटचाली मध्ये त्यांचा महत्व पुरण वाट आहे विद्यार्थ्यान साठी मोठे योगदान त्यांनी दिल्याचे श्रद्धांजली वाहताना अध्यक्ष अरविद राठी यांनी मनोगत व्यक्त केले. ईष्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे यांच्या शोक सभेचे आयोजन संस्थेच्या प्रागंणात करण्यात आले होते.

कार्याची दिली माहिती
ध्वनी फितीच्या माध्यमातून मुख्यध्यापक लांबोळे यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून दिलेली शिकवण यावर चित्रफीत विद्यार्थी उपस्थिताना दाखविण्यात आली. सरांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना या वेळी देण्यात आली. या वेळी शोक सभेत अरविंद राठी,दिलीप राठी, मानद सचिव मुकूंद राठी, विनर्स क्लब चे पियुष पाटील, अश्विनी कांबळे, संस्थेचे सदस्य विजय राठी व ,माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रस्ताविक अंजली बागुल यांनी केले. मुख्यध्यापक लांबोळे यांना विद्यार्थ्यांच्या ,शिक्षक , कर्मचारी यांनी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली.