विद्यार्थ्याला चिरडणार्‍या ट्रक चालकास अटक

0

भुसावळ – शांती नगरात क्लाससाठी दुचाकीने निघालेल्या वेदांत भालचंद्र दिवेकर (१७, हुडको कॉलनी, अयोध्या नगर) या शाळकरी विद्यार्थ्यास ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता जुना सातार्‍यातील गवळी वाडा भागात घडली होती. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा ट्रक चालक भास्कर नामदेव गावडे (२८, सावदा, ता.एरंडोल, जि.जळगाव) यास शहर पोलिसांनी अटक केली तर गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. वेदांत हा त्याचा मित्र मंगेश बाबाराव तळोकार (२९) सोबत दुचाकी (एम.एच.१९ बी.आर.९२४९) ने शांती नगरात क्लाससाठी जात असताना पाठीमागून आलेला भरधाव ट्रक (एम.एच.१९ झेड.७२७३) ने धडक दिल्याने वेदांत हा मागच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला होता तर ट्रक चालक पसार झाल्यानंतर शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला होता.