जळगाव : येथील मू.जे.महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या रोटरेक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. नूतन अध्यक्षपदी झैनब आरसीवाला तर सचिवपदी गौरव चव्हाण यांनी पदभार घेतला.
त्यांना मावळते अध्यक्ष नेहा खंदार आणि मावळते सचिव आदित्य पाटील यांनी पदभार दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.अनिल सरोदे, डॉ.सुरेश तायडे, अब्दुल आरसीवाला, रोटेरीयन संगीता पाटील, शंतनू अग्रवाल, हेमांगी पाटील, प्रा.जास्मिन गाजरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष शुभ्रा मंडोरे, सहसचिव अभिषेक कुलकर्णी, संपादक तेजस्विनी महाजन, सहसंपादक यश शिंपी, विश्वस्त चेतन येवले, नियोजन प्रमुख पुष्पक चौधरी, शुभम सोमाणी, जनसंपर्क अधिकारी यशराज उंबरकर, समृद्धी संत यांचा समावेश आहे.