विद्याार्थ्यांनी केले सामुदायिक स्वच्छ शपथ वाचन

0

 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले

निगडी : पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य खाजगी शाळा व शिक्षण संकुलातून स्वच्छ भारत स्वच्छता अभियान अंतर्गत जनजागृती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पर्यावरण संवर्धन समितीचे स्वयंसेवक इसिएतर्फे प्रत्येक शाळेत जावून शाळकरी मुलांकरवी स्वच्छ भारत शपथ वाचन सामुदायिकपणे करून घेत आहेत व त्यासाठी शाळा खूप सकारात्मक पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

घन कचरा व्यवस्थापन महत्व
गुरूवारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशु विहार प्राथमिक विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या 980 विद्यार्थ्यांनी व दुपारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या 2170 मोठ्या उत्साहाने सामुदायिक स्वच्छ भारत शपथ वाचन शाळेच्या पटांगणावर केले. सकाळी व दुपारी मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रसंगी इसिए अध्यक्ष संस्थापक विकास पाटील यांनी उपस्थितांना घन कचरा व्यवस्थापनाचे महत्व कथन केले. पिंपरी चिंचवड महापालिका सह आयुक्त दिलीप गावडे यांनी स्वच्छता शपथ वाचन केले.

प्रसंगी सह आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, आरोग्य निरीक्षक बापू गायकवाड, मुख्याध्यापक श्रीमती शैला गायकवाड, वर्षा नलावडे, फर्नांडीस अंजली, सारिका मोकाटे, मुख्याध्यापक शेख ए. एम., ठाकूर आर. के., डॉ. अभिजित भालशंकर, सुभाष चव्हाण, सिकंदर घोडके, शिरीष कर्णिक, गोविंद चितोडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर मेरुकर व आभार दत्तात्रेय कुमठेकर यांनी मानले.