विद्या निकेतन स्कूलने पटकावला ग्रीन फ्लॅग

0

पिंपरी-चिंचवड : टाटा मोटर्स एम्प्लॉइज एज्यूकेशन ट्रस्टचे विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘ग्रीन फ्लॅग अ‍ॅवार्ड’ पटकाविला आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण (सीईई) विभागाकडून इको स्कूल हा उपक्रम राबविला जातो. राष्ट्रीय पर्यावरण शिक्षण ही एक राष्ट्रीय संस्था आहे. जी पर्यावरणाचे संवर्धन व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारकडून स्थापन करण्यात आलेली आहे.

शाळा राबवते तीन उपक्रम
इको स्कूल उपक्रमांअतर्गत शाळेला 7 आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करावे लागते. त्यात पर्यावरणाचा आढावा, वर्गातील कृती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त लोकशाही सहभाग अशा विविध कृतींचा समावेश केला जातो. या कार्यक्रमांतर्गत विद्या निकेतन ÷इंग्लीश मीडियम स्कूल निरोगी जीवन, जैविक विविधता, उर्जा आणि कचरा या 3 विभागासाठी कार्य करते. जगातील 67 देशांमध्ये हा कार्यक्रम राबविला जातो. मागील वर्षी शाळेला जैविक विविधता विभागासाठी हॅण्डप्रिंट फ्लॅग प्राप्त झाला होता. यावर्षी शाळेला प्रत्येक विभागासाठी हॅण्डप्रिंट पुरस्कार प्राप्त करून आंतराष्ट्रीय ग्रीन फ्लॅग पुरस्कार पटकावला आहे.

अहमदाबादला पुरस्कार सोहळा
मुख्याध्यापिका विद्या गायकवाड, उपमुख्याध्यापिका वसंता रामकृष्णन, माध्यमिक विभागप्रमुख पर्यवेक्षिका बानी रॉय चॉधरी व प्राथमिक विभाग प्रमुख मीना फिग्रेडो यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे समन्वयक भारती जोशी व रिटा डाएस, बिन्दु मनोज यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. पुरस्कार प्रदान सोहळा अहमदाबाद येथे कार्तिकेय साराभाई राष्ट्रीय पर्यावरण शिक्षणाचे निर्देशन यांच्या उपस्थितीत पार पडला. शाळेच्या वतीने उपमुख्याध्यापिका वसंता रामकृष्णन यांनी स्विकारला.