झोपलेली यंत्रणा खडबडून जागी ; शुक्रवारी डीपी बसवण्याच्या आश्वासनाने अनर्थ टळला
रावेर- अजनाड शेती शिवारातील डीपी गेल्या दिवसापासुन जळाल्यानंतर ती त्वरीत बसवून द्यावी यासाठी रावेर वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही उपयोग न झाल्याने त्रस्त शेतकर्याने गुरुवारी कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचे धमकी दिली. झोपेचे सोंग घेतले प्रशासन जागे झाले व त्यांनी शुक्रवारी डीपी बसवून देण्याचे आश्वासन दिल्याने पुढील अनर्थ टळला.कपाशी लागवड करावयाची असतानाही डीपी बसवण्यास उशीर झाल्याने शेतकरी धोंडू मधुकर पाटील (खानापूर) यांनी खानापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याचे कार्यालय गाठले. डीपी द्या अन्यथा सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन करण्याची भूमिका घेतली. विभागीय सहाय्यक अभियंत्यांनी शुक्रवारी डीपी बसवण्याचे आश्वासन दिले.