विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने मजुराचा मृत्यू

0

भुसावळ । शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्समधील पुजा चष्माघर या दुकानाच्या डिजिटल बोर्डाचे काम करीत असताना मजुराला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तो उंचावरून खाली कोसळताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. कमलेश छोटूलाल शर्मा (42, शनी मंदिर वॉर्ड) असे मयताचे नाव आहे. शर्मा यांना डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचे वृत्त कळताच बाजारपेठ पोलिसांसह पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी धाव घेतली. रात्री उशिरा बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, शिवाजी कॉम्प्लेक्सला लागूनच वीज वाहक तारा हात लागेल इतक्या अंतरावर असल्याने वीज कंपनीने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.