विद्युत पुरवठा खंडित करीत साडेआठ लाखांच्या ऑईलसह कॉईलही लांबवली

Thieves stole oil from transformers worth 8.5 lakhs along with coils from Rigaon Shiwar मुक्ताईनगर : कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेच्या प्रोजेक्ट जवळील ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल तसेच सात लाख रुपये किंमतीचे साडेचार हजार लिटर ऑईल लांबवल्याची धक्कादायक 23 ते 28 ऑक्टोंबरदरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वीजपुरवठा खंडित करीत चोरी
खाजगी कर्मचारी राजेंद्र गंभीर पाटील (56, निंबोल, ह.मु.मोहन नगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेच्या प्रोजेक्ट जवळील ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा भामट्यांनी खंडित करीत वीज वायरी कापल्या व ट्रान्सफार्मरमधील एक लाख 65 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल तसेच सात लाख रुपये किंमतीचे साडेचार हजार लिटर ऑईल लांबवले. हा प्रकार 23 ते 28 ऑक्टोंबरदरम्यान घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रावण गोंडू जवरे करीत आहेत.