विद्युत पोलवरून पडून वायरमनचा मृत्यू

0

धरणगाव । गुजराथी गल्लीच्या जवळ विद्युत पोलवर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या एका सेवानिवृत्त वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘झिरो’ वायरमनचा विषय ऐरणीवर आला आहे. या संदर्भात अधिक असे की, काल संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास विक्रम जोशी यांच्या घरासमोरील विद्युत पोलवर वायर तुटलेली असल्यामुळे त्या परिसरात कार्यरत असलेल्या वायरमनने महावितरण मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चिंतामण पाटील यांना दुरुस्ती करण्यासाठी सांगितले. त्यानुसार चिंतामण पाटील हे विद्युत पोलवर दुरुस्तीसाठी चढले. परंतु वायर जोडणी करीत असताना कुणाच्या तरी घरातील इन्वरर्टरचे ‘बॅक करंट’ लागल्यामुळे चिंतामण पाटील पोलवरुन खाली पडले. त्यांना तात्काळ धरणगावातील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करीत जळगाव येथे रवाना करण्यात आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक त्यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला.