उल्हासनगर : नागरीकांना मोठयाप्रमाणात वाढीव वीजबिल देण्यात आल्याने तसचे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे, नागरीकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक समस्या नागरीकांना असल्याने त्याचा जाब विद्युत मंडळाच्या कार्यकारी अभियंताला विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी कॅम्प नं. 3 येथील साईबाबा मंदिर परिसरात असणार्या विद्युत मंडळावर धडक दिली.
त्यावेळी विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांची शिवसैनीकांनी भेट घेऊन त्यांच्यासमोर अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी राठोड यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळांना नागरीकांच्या समस्यांकडे मी स्वत: जातीने लक्ष देऊन सोडविण्याचे प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.