लोणावळा: नगरपरिषद हद्दीमधील नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील दैनंदिन कामांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढील काळात सदर ठेकेदाराच्या माध्यमातून नगरपरिषद शहरातील विद्युत वितरणशी संबंधित दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते सदर कामाचे उद्घाटन शुक्रवारी तुंगार्ली चौकात झाले. बाबा शेट्टी, ठेकेदार सुनील तावरे, माजी नगरसेविका सिंधू मालपोटे, नगरसेवक भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, देविदास कडू, आरोही तळेगावकर, रचना सिनकर, अपर्णा बुटाला, पूजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, अंजना कडू, सुर्वणा अकोलकर, गौरी मावकर, हर्षल होगले, आकाश कुटे, विजय इंगूळकर, गणेश मावकर हे उपस्थित होते.