विद्युत शॉकने बैलाचा मृत्यू : यावलच्या शेतकर्‍याला हंगामात मोठा फटका

0

यावल- शहरातील शालिक बळीराम ढाके यांच्या बैलाला शेतातून गेलेल्या विद्युत तारेचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. फैजपूर रस्त्यावर शेतकर्‍याचे शेत असून पावसामुळे वीज वाहक तार शेतात पडली तर या तारेचा बैलाला धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याने ऐन हंगामात शेतकर्‍यावर संकट कोसळले आहे. वीज वितरण कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शेतकर्‍याने उप अभियंता मराठे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते, धीरज महाजन, राजू फालक, गणेश महाजन, आसीफ खान, फारुख हाजी, अमोल बारी हे उपस्थित होते.