पिंपरी चिंचवड : शहरातील विद्युत विषयक नागरिकांच्या समस्या संदर्भात महापौर राहुल जाधव यांनी शहरातील विद्युत विषयक समस्या सोडविण्याबाबत सुचना दिल्या.
हे देखील वाचा
सोमवार दि. 26 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कंपनीच्या भोसरी कार्यालयास महापौरांनी भेट दिली. त्यावेळी, ओव्हरहेड वायर अंडरग्राऊंड करणे, फिडरपिलरची सुरक्षेच्या दृष्टीकोणातून योग्य ती दुरूस्ती करणे. तसेच ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड वायरचे काम पूर्ण झालेले आहे, त्या ठिकाणचे उपयोगात नसलेले पोल आणि वायर काढून टाकणे, नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेणे आदी विषयीच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग राहूल गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास आल्हाट उपस्थित होते.