विद्रोही साहित्य संमेलन अध्यक्षपदी कॉ.नजूबाई गावीत

0

शहादा । येथे होणार्‍या 13 व्या विद्रोहीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कॉ. नजुबाई गावीत तर स्वागताध्यक्षपदी जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यीक वाहरु सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या व समविचारी संस्था, संघटनेच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. बैठकीतच्या अध्यक्षस्थानी वाहरु सोनवणे हे होते. बैठकीला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, शहादा तालुकाध्यक्ष अनिल कुवर, स्टडी सर्कलचे सुनिल पाटोळे, जनार्थ संस्थेच्या रंजना कान्हेरे, महाराष्ट ्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जेलसिंग पावरा, लेखक गौतम मोरे, प्रा. राजेंद्र निकुंभे, दामू नाइृक, शांतीलाल सामुद्रे, नरेंद्र महिरे, किरण मोहिते आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक संयोजन समितीबाबत चर्चा
बैठकीत विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व स्थानिक संयोजन समिती नियुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले. संमेलन अध्यक्षांची निवड यापूर्वी झालेल्या बैठकी करण्यात आले होते. त्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. शहाद्यात होणार्‍या 13 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. नजूबाई गावित यांची तर स्वागताध्यक्षपदी कॉ. वाहरु सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीत संमेलनाच्या स्थानिक संयोजन समिती देखील गठीतकरण्यात आली. स्थानिक संयोजन समितीच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यांची तर सचिवपदी चुनिलाल ब्राम्हणे यांची निवड करण्यात आलेली आहे. सहसचिव किरण मोहिते, खजिनदार रविंद्र मुसळे, दामू ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीत संमेलनात घेण्यात येणार्‍या परिसंवादाचे विषय व वेे ठरविण्यात आले तसेच इतर कार्यक्रम व उपक्रमांची रुपरेषा निश्‍चित करण्यात आली.

या स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य
संमेलन यशस्वीतेसाठी महाराष्ट ्र विद्रोही सांस्कृतिक चळवळ, फुले आंबेडकर स्टडी सर्कल, आदिवासी एकता परिषद, पावरा उन्नती मंडळ, फुले, शाहू आंबेडकर विचार मंच तळोदा, महाराष्ट ्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, प्रशिक बहुउद्देशिय मंडळ, महाराष्ट ्र पुरोगामी पत्रकार संघ नंदुरबार, बोधिवृक्ष परिसर मित्र मंडळ, ब्ल्यु टायगर ग्रृप, बी-बॉईज ग्रृप, भिलीस्थान टायगर सेना, जातीअंत संघर्ष समिती आदींसह विविध सामाजिक, संस्था व संघटना सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात