सखी श्रावण महिला बहुउद्देशीय संस्थेने रचला आदर्श पायंडा
भुसावळ- शहरातीलस सात विधवा महिलांना तीळगुळसह साडी वाटप करून समाजात आदर्श पायंडा शहरातील सखी श्रावण महिला बहुउद्देशीय संस्थेने राबवल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. रोटरी क्लब भवनात नुकताच महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे होत्या. प्रसंगी त्यांनी मंडळाच्या उपक्रमाचेे कौतुक करीत महिलांनी घराबाहेर पडून स्वतःची कामे स्वतः करण्याचे आवाहन केले तसेच वैधव्य यावे ही कुठल्याही स्त्री वाटत नसते मात्र संस्थेने या महिलांचा केलेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद पायंडा असल्याचे त्या म्हणाल्या.
काळाबरोबर बदल स्वीकारले पाहिजे -राजश्री नेवे
सखी संस्थेच्या संस्थापिका राजश्री नेवे म्हणाल्या की, जुन्या रूढी-परंपरांना फाटा देण्यात आला असून सात विधवा महिलांना तीळगुळासह साडीचे वाटप करण्याचा आदर्श पायंडा यंदाच्या वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. संस्थेतर्फे दर महिन्याला अन्नदान करण्यात येते तसेच संस्न्ृती व परंपरा टिकून राहण्यासाठी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगत शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जात असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
निता गाजरे यांनी केंद्र शासनाच्या पेन्शन योजना, सुकन्या योजनेची माहिती दिली. कार्यक्रमास निता गाजरे, साकरीच्या ग्रामपंचायत सदस्या व नरेंद्र मोदी विचार मंच जिल्हाध्यक्षा निर्मला कोळी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रतिभा विसपुते यांनी केले. कार्यक्रमासाठी माया चौधरी, मनीषा वानखेडे, लीना बाविस्कर, पूजा नेवे, कामिनी नेवे, श्रद्धा नेवे, सुरेखा ठाकूर, अंजली नेवे, राधिका वाणी, मनीषा नेवे यांनी परीश्रम घेतले. उमेश नेवे व नारायण कोळी यांनी सहकार्य केले.