विधवा महिलांना शिंदे यांच्या हस्ते पेन्शनपत्राचे वाटप

0

पिंपरी : संजय गांधी विधवा व निराधार अनुदान योजनेअंतर्गत पिंपरी मतदारसंघातील 85 महिलांना पेन्शनपत्राचे वाटप माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. संत रविदास विचार समितीच्यावतीने प्राधिकरण येथे आयोजित चर्मकार समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळयासाठी शिंदे येथे आले होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी उपस्थित होते.

समाजातील उपेक्षित वर्गाला या योजनेतून मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, संजय गांधी अनुदान प्रकरणे तातडीने मंजूर करण्याचे शासनाचे आदेश असून महिलांनी आपले प्रस्ताव जमा करावेत असे आवाहन घोलप यांनी केले आहे.