तळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन वसाहतीत विधवा महिलेचा विनयभंग करणार्या तुमड्या उर्फ आखाड्या मोना पावरा याला तळोदा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.जी. मोरे यांनी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पावराने 4 सप्टेंबर 2013 मध्ये रात्री एका विधवा महिलेच्या घराचे कौले काढून आत प्रवेश केला होता. पीडित महिलेने आरडाओरड केल्यावर तो पळून गेला होता. याप्रकरणी तळोदा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.