विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर तर सभागृह नेतेपदी सुभाष देसाई

0

मुंबई: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यांची सभागृहात अधिकृतरित्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षातर्फे सभागृह नेतेपदी मंत्री सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, सुरेश धस, भाई गिरकर यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपमध्ये विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अंतर्गत वाद पाहायला मिळाले.