विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने!

0

सोलापूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी येत्या 7 डिसेंबररोजी पोटनिवडणूक होत असून, या जागेसाठी काँग्रेसने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माने हे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त उमेदवार
या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. या जागा जिंकण्यासाठी 145 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 81 आमदार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त उमेदवार उभा करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राणेंनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आहोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच म्हटले होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.