मुंबई । कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभाग व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, मराठी अभिमान गीत गाऊन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिध्द गायक कौशल इनामदार आणि त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीताचे मान्यवरांसमवेत समूह गायन केले.
समूह गायनाला मोठा प्रतिसाद
यावेळी विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, दोन्ही सभागृहांचे सदस्य, पुरस्कार प्राप्त मान्यवर साहित्यिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानभवन प्रागंणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समूह गीत गायनानंतर विधीमंडळाच्या आवारात खास बोलावलेल्या, प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये प्रथम क्रमांक विजेत्या महाराष्ट्राच्या चित्ररथास सर्वांनी भेट दिली. आज दिवसभर हा चित्ररथ विधीमंडळ आवारात ठेवण्यात येणार आहे.
गायनाच्या कार्यक्रमात तांत्रिक बिघाड
1 हे मराठी अभिमान गीत गायक कौशल इमानदार आणि त्यांच्या सहकार्यांच्या साहाय्याने गाण्यात आले. हे गीत सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने संगीत बंद पडले.
2 त्यामुळे गाणार्यांची धांदल उडाली. परंतु, इनामदार यांनी प्रसंगावधान राखून गीत गायन सुरूच ठेवले. मात्र, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या कार्यक्रमाचे अशा क्षुल्लक कारणावरून फियास्को होत असल्याचे हे खेदजनक असल्याचे आरोप सभागृह सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी केला.
3अजित पवार यांनी प्रशासनाच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली. दिल्ली येथे 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात शिवाजी महाराज यांच्या रथाच्या प्रतिकूलतेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
4या रथाचे यावेळी दर्शन उपस्थितांनी घेतले. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या विशाखा या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याने
अभिनंदन करण्यात आले.
मराठी भाषा विभाग व वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला समूह गायनाचा कार्यक्रम प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये प्रथम क्रमांक विजेत्या महाराष्ट्राच्या चित्ररथास सर्वांनी भेट दिली. दिवसभर हा चित्ररथ विधीमंडळ आवारात ठेवण्यात येणार आहे.