विधानभवनात कोरोनाची धडक; विधानसभा अध्यक्षाच्या पीएला लागण

0

मुंबईः कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातला आहे. आता मंत्री, आमदार, खासदारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. ठाकरे सरकारमधील चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी होत असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर विधानभवनाच्या 50% कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र विधानभवनातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कर्मचारी चिंतेत आहे.