धुळे– राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या आहे. विकासकामे सुरु आहेत.त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त ते धुळे येथे आले. धुळ्यातून जळगावकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. राष्ट्रवादीच्या यात्रेची परिस्थिती काय आहे हे सांगण्याची गरज नसून काँग्रेसकडेही यात्रा आहे की नाही याची कल्पना नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला टोला लगावला. दरम्यान, त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
कर्जमाफीपोटी खान्देशातील शेतकर्यांना 4 हजार 600 कोटी, तर विमा आणि बोंडअळी अशा प्रकारांसाठी 10 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले.