विधानसभा निवडणूक २०१८: सुरुवातीच्या निकालात कॉंग्रेस आघाडीवर

0

नवी दिल्ली-पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. जवळपास सर्वच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येते. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस १०८ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप १०६ जागांवर आघाडीवर आहे.

राज्यस्थानमध्ये कॉंग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहे. याठिकाणी भाजप ७४ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने भक्कम आघाडी मिळविली आहे. याठिकाणी कॉंग्रेस ५४ तर भाजप २४ जागांवर आघाडीवर आहे.