विधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव

0

जळगाव: असोदा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनलने विजय संपादित केले आहे. विशेष म्हणजे २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रामपंचायत निवडणुकीत यात पराभव झाला आहे. असोद्यातील जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती रवींद्र देशमुख यांचा याना ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. विद्यमान उपसरपंच अरुण कोळी यांनी त्यांचा पराभव केला. पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांनी नेतृत्त्व केलेल्या पॅनलचा विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या रवींद्र देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.