विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भगवा फडकणारच

0

शिवसेना शहर प्रमुख नीलेश महाजन यांची ग्वाही

भुसावळ : पक्ष संघटन मजबूत करण्यासह जनहिताची कामे करण्यासाठी उपाययोजना आखल्या असून सर्व नवीन च जुने कार्यकर्ते मिळून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवूच, अशी ग्वाही शिवसेनेचे नूतन शहर प्रमुख नीलेश महाजन यांनी येथे दिली. नूतन पदाधिकारी निवडीनंतर स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पदाधिकारी निवडीनंतर सत्कार
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शिवसेना नेते खासदार संजय राऊत, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, रवींद्र मिर्लेकर, कार्यकारीणी निवडीबाबत तालुका संपर्कप्रमुख विश्राम साळवी, विधानसभा संपर्क प्रमुख संजय शिरोडकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी भुसावळ शहर शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पदाधिकारी निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांतर्फे नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

असे आहेत नूतन पदाधिकारी
यात तालुका संघटकपदी प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा संघटक नीलेश सुरळकर, उपतालुकाप्रमुख मनोहर बारसे, शहरप्रमुख उत्तर विभाग नीलेश महाजन, शहर प्रमुख दक्षिण विभाग नितीन (बबलू) बर्‍हाटे, शहर संघटक उत्तर विभाग योगेश बागुल, शहर संघटक दक्षिण विभाग जगदीश खेराडे, शहर प्रमुख वरणगाव रवींद्र सुतार, शहर संघटक वरणगाव सतीश चंदने आदींची निवड करण्यात आली. जिल्हा उपसंघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड.श्याम श्रींगोदेकर, प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका प्रमुख समाधान महाजन, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, माजी शहर प्रमुख व नगरसेवक मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, व्यापारी सेना जिल्हा संपर्क प्रमुख अबरार ठाकरे, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शहर प्रमुख मनोज पवार, महिला आघाडीच्या चंद्रकांता बोरसे, शहर प्रमुख पूनम बर्‍हाटे, उज्ज्वला बागुल, वाहतूक सेनेचे रफीक खान आदींची उपस्थिती होती.