विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सेनेचे विजय औटी बिनविरोध !

0

मुंबई-विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल उपाध्यक्ष पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ३ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र आज माघारीनंतर एकमेव विजय आवटी यांचे अर्ज शिल्लक राहिल्याने आमदार औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी निवडीनंतर उपाध्यक्ष आवटी यांना आसनस्थ केले.

आमदार बच्चू कडू आणि कॉंग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केले होते. आज त्यांनी अर्ज मागे घेतला.

चार वर्षापासून हे पद रिक्त होते. मुख्यमंत्र्यांनी निवडीनंतर उपाध्यक्ष आमदार औटी यांचे अभिनंदन केले आहे. उपाध्यक्ष पद देऊन भाजपने शिवसेनेची नाराजी दूर केली आहे. .

नवनियुक्त उपाध्यक्ष विजय औटी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. तिसऱ्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले आहे.