विधानसभेत आमदार हरिभाऊ जावळे आणि सतीश पाटील यांच्यात जुंपली !

0

मुंबई: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. आज रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी दुष्काळावर चर्चा करतांना या सरकारने दुष्काळ प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भयावह दुष्काळ असताना सरकारने शेतकऱ्यांना भरपूर मदत केली आहे असे सांगितले, यावर पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी आक्षेप घेत, टीका केली. यावरून आमदार हरिभाऊ जावळे आणि आमदार सतीश पाटील यांच्यात चांगलेच जुंपले. आमदार जावळे यांनी तुमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळाली नाही असे आमदार सतीश पाटील यांच्यावर आरोप केले.

शेतकऱ्यांना वीजबिल माफ करण्यात यावी अशी मागणी आमदार जावळे यांनी केले. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी.