विधानसभेत खडसे जयंत पाटील यांच्यावर चिडले

0

नागपूर-विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी लागावी यासाठी आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या आग्रह करत पाया पडाव्या लागतात असे व्यक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केले. या वक्तव्यावर आक्षेप घेत माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे जयंत पाटील यांच्यावर चांगलेच चिडले. जयंत पाटील यांनी हे  वक्तव्य मागे घेऊन संपूर्ण सभागृहाची माफी मागावी अशी मागणी खडसे यांनी केली. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने खडसे चांगलेच चिडल्याचे दिसून आले.

लक्षवेधी लागावी यासाठी अध्यक्षांचे पाया पडावे लागतात याचा अर्थ काय? या ठिकाणी वसिलेबाजी चालते का? असा प्रश्न उपस्थित करत खडसे यांनी जयंत पाटील यांना खडसावले. जयंत पाटील यांनी केलेले वक्तव हे शुद्ध हेतूने नव्हते असे देखील खडसे यांनी यावेळी  सांगितले.