जळगाव। बीएस-3 च्या वाहनांवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर होंडा मोटोकॉर्पकडून दुचाकींवर 12,500 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. प्रिमीयम प्रकारात7,500 व प्रवासी मोटारसायकलवर 5 हजारांची सवलत आहे. या सवलतीसाठी दुचाकीची खरेदी एकरकमी करुन शुक्रवारीच परिवहन खात्यात नोंदणी करुन घेऊ शकतो, याची खात्री ज्यांना असेल त्यांनी हे धाडस करावे असे जळगावात विक्रेत्यांकडून सांगितले जात होते.
नागरिकांचे आरोग्य महत्वाचे
भारतात 1 एप्रिल 2017 पासून भारत स्टेज-4 उत्सर्जन मानकाची अंमलबजावणी होणार आहे. बीएस-3 वाहनांचा साठा विकण्यास न्यायालयाने कंपन्यांना एक वर्षांचा कालावधी देण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आता या निर्णयावर आक्षेप घेता येणार नाही. वाहनांपेक्षा नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे, असे सांगितले होते.
8 लाखांहून अधिक वाहने उपलब्ध
सध्या देशभरात बीएस-3 इंजिन असलेली तब्बल 8 लाखांहून अधिक वाहने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त वाहनांची विक्री नुकसान टाळण्यासाठी हिरो मोटोकॉर्पने डिस्काऊंट जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त वाहनांची विक्री करण्याचा हिरो मोटोकॉर्पचा प्रयत्न आहे.